नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, मृत्यूच्या चौकशीसाठी समिती

येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बालउपचार कक्षात एकाच वेळी चार नवजात बालके दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या चारही बालकांचा मृत्यू संशयास्पद असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही बालके मृत्युमुखी पडल्याचा आरोप बालकांच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी सोमवारी रुग्णालयात एका डॉक्टरला मारहाण केल्याने तणावात भर पडली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

पूजा घरडे (रा. व्यकंय्यापुरा), माधुरी कावरे (रा. राजहिलनगर), शिल्पा वेरूळकर (रा. किरणनगर) आणि अफरिन बानो अ. राजिद (रा. चांदूर बाजार) यांच्या नवजात बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालउपचार कक्षात दाखल करण्यात आले होते. या चारही बालकांचा पंधरा मिनिटांच्या कालावधीत मृत्यू झाला. रात्री अकरा वाजता ही माहिती बालकांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर खळबळ उडाली. त्यावेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका यांच्याकडून व्यवस्थित माहिती दिली न गेल्याने नातेवाईक संतापले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस पथकही रुग्णालयात पोहचले. त्यांनी बालकांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला.