23 November 2020

News Flash

करोना चाचणी झाली आणखी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

राज्यात करोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा सुधारणा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले आहेत. आता प्रती तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार आता चाचण्यांसाठी ९८०, १ हजार ४०० आणि १हजार ८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत.

तर, ४ हजार ५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

करोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून, प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १हजार ४०० रुपये, तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १ हजार ८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यात करोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून, प्रती १० लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात आहेत. शिवाय, या चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. जेणेकरुन करोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 4:24 pm

Web Title: fourth improvement in corona test rates in the state msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं-नारायण राणे
2 राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात; हवामान विभागाची माहिती
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘नेपोटिझम प्रॉडक्ट’ असल्याचा कंगनाचा हल्लाबोल
Just Now!
X