गारपिटीने जिल्ह्य़ातील निफाड आणि सिन्नर तालुक्यास झोडपले असताना गुरुवारी नाशिक, कळवण, सुरगाणा मालेगाव तालुक्यासह इतर भागास अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करावा लागला. गारपिटीत सापडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर शेती भुईसपाट झाल्याचे पाहून हृदयविकाराच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचे निधन झाले.
लातुरात गारपिटीचे तांडव सुरूच
मुळा नदीपात्राच्या पट्टय़ात मोठा तडाखा
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला गारपिटीने झोडपून काढले आहे. निफाड व सिन्नर तालुक्यातील काही भागात तडाखा दिल्यानंतर गुरुवारी कळवण, मालेगाव व सुरगाण्यासह नाशिक तालुक्याचा काही परिसरात पुन्हा गारपीट झाली. त्यात द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 गारपिटीने पिकांचे झालेले नुकसान पाच पटीने जास्त
अनेक ठिकाणी द्राक्षबागा व हाताशी आलेला गहू आडवा झाला. गारपिटीत सापडून सिन्नर तालुक्यातील निवृत्ती आबाजी हांडोरे (६०) या शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. तर गुरुवारी निफाड तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी माधवराव कोंडाजी गोरडे (६२) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
गारपीटग्रस्तांच्या मदतीला आचारसंहितेचा अडसर नाही
त्यांची एक एकर द्राक्षबाग तर तीन एकर इतर शेती आहे. गारपिटीत संपूर्ण शेती भुईसपाट झाली. सकाळी शेतात जाऊन ही परिस्थिती पाहिल्यावर ते अस्वस्थ झाले. घरी परतल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून त्यांचे निधन झाले. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. गारपिटीत निफाड व सिन्नर या दोन तालुक्यात ५,३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्याचा ७५७४ शेतकऱ्यांना फटका बसला.
चासनळीला नुकसानीच्या धक्क्य़ाने वृद्धेचे निधन