News Flash

गूढ उलगडले, ८०० रुपये आणि मेमरी कार्डसाठी मित्रानेच केली हत्या…

उसने घेतलेले ८०० रुपये आणि मेमरी कार्ड साठी हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

एक महिण्यापूर्वी बस चालकाचा राहटणी येथे धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.ही हत्या मित्रानेच केवळ ८०० रुपयांसाठी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.या खुनाचा उलगडा एक महिन्यानंतर झाला असून पवन उर्फ अनिल रमेश सुतार अस हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.याप्रकरणी मित्र अनिल श्रावण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. उसने घेतलेले ८०० रुपये आणि मेमरी कार्ड साठी हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की,१६ जुलैच्या रात्री बस मध्ये पवन उर्फ अनिल सुतार याची हत्या करण्यात आली होती.त्याचा मृतदेह हा बस मध्ये आढळला होता.ही घटना राहटणी परिसरात घडली होती.पवन उर्फ अनिल सुतार अस मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून अनिल मोरे असं आरोपी मित्राचे नाव आहे.दोघे मित्र सुतार काम करायचे तर एका खाजगी बसवर अनिल उर्फ पवन चालक म्हणून काम करत होता.दोघांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या सुतार कामाची मजुरी पवनने घेतली.त्यापैकी आठशे रुपये पवनने अनिलला न देता, स्वतः खरचले.दारूच्या पार्ट्या ही एकत्रच रंगायच्या इतकंच काय तर ते दोघात एकच मोबाईल वापरत असे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

मूळ मोबाईल हा अनिलचा होता,मात्र मैत्रीसाठी तो पवनला वापरायला देत असे. तेंव्हा स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ ठेवण्याची तयारी तो नेहमीच दाखवत असे. एके दिवशी मात्र पवन कडचे पैसे संपले आणि त्याने मोबाईलमधील मेमरी कार्ड गहाण ठेवून दारू घेतली. मग मात्र अनिल आणि पवनमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. हत्येच्या दिवशी सकाळी दारू पिताना पुन्हा आठशे रुपये आणि मेमरी कार्ड वरून वाद झाला.मयत पवन उर्फ अनिल सुतार ने अनिल मोराला कानशिलात लगावली.मात्र हे सहन झाले नाही.त्याने पुन्हा दारू पिट त्याच नशेत बसमध्ये झोपलेल्या पवनवर उर्फ अनिल सुतारवर पटाशीने हल्ला करत त्याची हत्या केली.अनिल मोरेनेच पवनची हत्या केली होती.मात्र वाकड पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहचत त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 6:52 pm

Web Title: friend murder for 800 rupees in pune
Next Stories
1 धक्कादायक! पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या
2 आरक्षणासाठी मराठा बांधवांचे २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण
3 पुण्यात शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू
Just Now!
X