27 September 2020

News Flash

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी

राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवावर यंदा करोनाचं सावट आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील गणेशोत्सवाला बसला आहे. (सर्व छायाचित्रे - प्रदीप दास)

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.​

यासंदर्भात शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
​टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.​


सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 4:03 pm

Web Title: ganeshotsav 2020 no toll konkan ganpati festival nck 90
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 “पवार साहेब, पार्थवर इतका राग CBI चौकशीच्या मागणीचा की राम मंदिराचे समर्थन केल्याचा?”
2 “कुटुंबात कलह कशासाठी….”, शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
3 कृषी विद्यापीठात विभाग प्रमुख पदावर नियुक्तीवरून एका वर्षानंतर वाद
Just Now!
X