29 September 2020

News Flash

काळाचा घाला ! विसर्जनासाठी जाणाऱ्या बॅन्ड पथकाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू ; 8 गंभीर

सिंदखेडराजा येथे गणपति विसर्जनासाठी बॅण्ड पथक जात होतं

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात पोहनाजवळ मिनी ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत ६ जण जागीच ठार तर ४ जण जखमी झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पथकावर काळाने घाला घातला आहे. शनिवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास पिकअप आणि लक्झरीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील बँड पार्टीच्या वाहनास भीषण अपघात झाला. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ नागपुर मुंबई महामार्गावर रात्री  तीन सुमारास ही घटना घडली. या अपघातात 8 जण गंभार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीबी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा येथे गणपति विसर्जनासाठी बॅण्ड पथक जात होतं. वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील पिकअपमध्ये दहा ते बारा जण होते. ब्राह्मण चिकना गावाजवळ आले असता, त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरुन येणाऱ्या लक्झरी बससोबत या पिकअपची जोरदार धडक झाली. लक्झरी बस व पिकअपमध्ये व जोरदार धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील रहिवासी आहेत. या अपघातात अरूण संजय कांबळे (22), राजु भगवान कांबळे (25), ज्ञानेश्वर वामन डोंगरे (20) यांच्यासह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 11:05 am

Web Title: ganpati visarjan banjo squad accident 5 killed and 8 injured accident near buldhana
Next Stories
1 डीजे बंदी : पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्येही विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार
2 विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई-नवी मुंबईतील अनेक रस्ते बंद, जाणून घ्या वाहतूक व्यवस्था
3 पुढच्या वर्षी लवकर या ! बाप्पा निघाले गावाला
Just Now!
X