केंद्र आणि राज्य पुरस्कृत  निवासी योजनेतील घरबांधणी साहित्यांची बचत गटांमार्फत विक्री

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड

पालघर : पीपीई पोशाख, मुखपट्टी, नाचणी बिस्कीट, कृषी क्षेत्रातील विविध उत्पादने आदी विविध क्षेत्रात यशस्वी झेप घेतल्यानंतर आता महिला बचत गट व महिला ग्रामसंघानी बांधकाम क्षेत्रामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार  घर  बांधण्यासाठी एकाच ठिकाणी मिळणारे  साहित्य असलेली ‘घरकुल मार्ट’ या सुरू केलेल्या संकल्पनेला संपूर्ण जिल्ह्यत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पालघर जिल्ह्यतील विविध तालुक्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना जोडून घरकुल मार्ट ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्षात अमलात आणली आहे. या घरकुल मार्ट अंतर्गत घरकुलाला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य घरकुल मार्टच्या माध्यमातून लाभार्थ्यांंना विकले जात आहे. प्रत्येक गावात हे घरकुल मार्ट उभे राहत असल्याने लाभार्थ्यांंना घरकुलाला लागणारे सर्व सामान गावातच मिळत आहे.  लाभार्थी घरकुलाची विविध साहित्य खरेदी करत असल्याने त्या माध्यमातून बचत गटांना व ग्रामसंघांना आर्थिक आधार मिळत आहे.

पालघर जिल्ह्यतील वाडा, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वसई या तालुक्यांमध्ये प्राथमिक तत्त्वावर घरकुल मार्ट उभारण्यात आले आहेत. या मार्टची सर्व सूत्रे महिलांनी स्वीकारली आहेत. हे आवाहनात्मक काम असले तरी साहित्य मागणी असल्याने इतर बचत गट व ग्रामसंघ पुढे येऊन घरकुल मार्टची मागणी करीत आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रातील यशस्वी झेपेनंतर आता गृहनिर्माण क्षेत्रात बचत गट व ग्रामसंघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने या क्षेत्रातून या महिलांच्या ठोस अर्थार्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उमेद अभियानातून मिळणाऱ्याा उपजीविका निधी व सामुदायिक गुंतवणूक निधींतून घरकुलासाठी लागणारे सिमेंट, विटा, खिडक्या, दारकेसी, लादी, पत्रे आदी साहित्य बचत गट थोक पद्धतीने खरेदी करून त्यावर नफा ठेवून बाजारभाव किंमतीने ते घरकुल लाभार्थी यांच्यासह खाजगी घरे बांधणाऱ्याना विक्री करीत आहेत. गावातच घरबांधणीचे साहित्य उपलब्ध होत असल्याने ते खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शिवाय वाहतूक खर्चही वाचत आहे. त्यामुळे ही संकल्पना यशस्वी होत आहे,असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी म्हटले आहे. आता गृहनिर्माण क्षेत्राच्या माध्यमातून महिलांनी रोजगाराच्या संधी शोधल्याने त्यांचे आर्थिक सबलीकरण होऊन त्या सक्षम होणार असल्याचा आनंद आहे असेही दिवे यांनी म्हटले आहे.

घरकुल मार्टच्या माध्यमातून बचत गट आणखीन बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हानात्मक क्षेत्रातून संधी शोधत महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी अशा संकल्पना अमलात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा आनंद आहे.

-सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर