राष्ट्रवादीकडून या प्रकरणाची चौकशीची मागणी
डाळीच्या भाववाढीमुळे टिकेचे धनी ठरलेले अन्न नागरी व पुरवठा मंत्री गिरीष बाबट आता अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे. तुरडाळीचा साठेबाजार करणाऱ्या कंपनीला गुपचुप भेट दिल्याने उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादी या संपुर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या ई.टी.सी. अ‍ॅग्रो या कंपनीमध्ये ६ हजार टन डाळीचा साठा असल्याने पुरवठा विभागाने कंपनीमध्ये धाड टाकली होती. यात  सुमारे ५५ कोटी रूपयांची बेकायदेशीरपणे आढळून आली होती.  राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी अचानक कंपनीत भेट देवून पाहणी केली. बापट यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापट नक्की कसली पाहणी करण्यासाठी आले होते असा सवालही उपस्थित केला जात विशेष म्हणजे या दौऱ्या दरम्यान बापट यांच्या बरोबर शासकीय यंत्रणा नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.
राज्यात तुरडाळीचे भाव अचानक वाढल्याने पुरवठा विभागाने तुरडाळ गोदामांवर धाडसत्र सुरू केले होते. राज्यभर हे धाडसत्र सुरू असताना २७ ऑक्टोबरला खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या ई.टी.सी. कंपनीत धाड टाकून ५५ कोटी रूपयांची डाळ जप्त करण्यात आली होती. या कंपनीला अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी भेट दिली. बापट येणार आहेत. याची कुणकुणही कुणाला नव्हती. पोलीस यंत्रणेसह खालापूरचे तहसिलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी त्यामुळे बापट यांच्या सोबत उपस्थित नव्हते. बापट यांच्या गाडीवरील अंबर दिवाही काढून ठेवण्यात आला होता. मात्र कंपनीच्या मालकांसोबत बापट कंपनीची पाहणी करत असल्याचा सुगावा स्थानिक पत्रकारांना लागला. पत्रकार त्या ठिकाणी झाले. त्यानंतर मात्र बापट यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केला.  राज्यातील डाळीचे भाव स्थिर रहावेत व बाजारात डाळीची आवक वाढावी असा आपला प्रयत्न असून त्या दृष्टीने ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत पकडलेली २४ हजार मेट्रिक टन तूर डाळ जप्त करण्यात आली आहे. या तुरीवर प्रोसेसिंग करणे गरजेचे आहे. खालापुरच्या या कंपनीत एकाच वेळी १२० ते १४० मेट्रीक टन डाळीवर प्रोसेसिंग करता येऊ शकते. हिबाब लक्षात घेऊन या कंपनीला आज भेट दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी खालापुर येथील मयुरेश प्रोटीन्स या कंपनीला भेट दिली. सहा वर्षापुर्वी या कंपनीवरही बेकायदा तुर आणि धान्यसाठा केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली हेती. याभेटीवेळी मात्र शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यात आले.

मात्र बापट हे कॅबिनेट मंत्री आहेत. सुरक्षेच्या मात्र शासकीय यंत्रणेला या दौऱ्याची माहीती का दिली नाही, त्यामुळे बापट यांची गुढ भेट संशय निर्माण करणारी असून मुख्यमंत्र्यांनी या भेटीची चौकशी करावी अशी मागणी आ. सुरेश लाड यांनी बुधवारी खालापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. नागरीकांच्या हितासाठी हा दौरा होता की कंपनी मालकाच्या हितासाठी हे स्पष्ट होण गरजेच आहे, दरम्यान या कंपनीत जप्त करण्यात आलेला तुरडाळीचा साठा रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वाटप करावा अशी विनंतीही लाड यांनी केली