कॉंग्रेस पक्षाने गांधीजींच्या नावाचा फक्त राजकीय लाभासाठी वापर केला आहे. गांधीजी कधीच कॉग्रेसचे नव्हते आणि महत्वाचे म्हणजे गांधीजींची विचारधारा ही भाजपाचीच होती, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपाने गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘जयंती ते पुण्यतिथी‘ असा कार्यक्रम आखला असून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी गांधी पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रे संदर्भात बोलतांना जलसंपदामंत्र्यांनी गांधीजींविषयी भाजपची भूमिका विषद केली. महात्मा आपलेच असल्याने त्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या मार्गावर चालावे असे आवाहान महाजन यांनी केले. गिरीश महाजन म्हणाले, ‘राम‘ नामाचा जप करा आणि गांधी मार्गावर चलायला शिका!’

गांधीजींच्या विचारांनुसार कॉग्रेस नव्हे तर भाजपा चालत आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण भाजपा करत आहे. महात्मा गांधी हे भाजपाच्याच विचारांचे होते, असा दावा करुन भाजपा कार्यकत्यांनी ‘राम‘ नामाचा जप करावा आणि गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करावे असा सल्लाही यावेळी जलसंपदामंत्री महाजन यांनी दिला. महाजन यांच्या या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. काँग्रेस नेते याला काय प्रतिउत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

देशात सर्वकाही गांधीजींच्या मार्गाने सुरू आहे. पंतप्रधानांची प्रशासनावर पकड आहे. त्यांच्याबात कोणी बोलू शकत नव्हते. शरद पवार यांची जीभही त्यांच्याबाबत बोलण्यास वळू शकत नाही. राफेलबाबत पवारांनी मोदीजींच्या बाजूने मत मांडले. मात्र पक्षातील खासदारांनी राजीनामा सत्र सुरू केल्यामुळे स्पष्टीकरण द्यावे लागले असे महाजन म्हणाले.