28 February 2021

News Flash

सांगलीतील वसतिगृहात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षता कोष्टी असं या मुलीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. वालंचंद महाविद्यालयात ती बीई सिव्हिलचं शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली यामागचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अक्षता कोष्टीने महावद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आत्महत्या केली.

आज सकाळी तिच्या खोलीत तिचा मृतदेह पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अक्षता ही मूळची जत तालुक्यातील डफळापूरची रहिवासी असून सिव्हिल इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. अक्षता कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रुममध्ये पाच मैत्रिणींसोबत राहात होती. आज सकाळी तिच्या इतर मैत्रिणी महाविद्यालयात गेल्या. यानंतर त्यापैकी काही जणी खोलीमध्ये आल्या तेव्हा त्यांना अक्षताचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर त्यांनी तातडीने हॉस्टेल अधीक्षकांना याबाबतची माहिती दिली. कॉलेज प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना याबाबत कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 6:25 pm

Web Title: girl commits suicide in sanglis walchand engineering collage hostel
Next Stories
1 आधी दळभद्री सरकारमधून बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा! – राधाकृष्ण विखे पाटील
2 प्लॅस्टिक बॅग बाळगणाऱ्यांना भररस्त्यात उठा-बशा काढायची शिक्षा
3 खुशखबर ! महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त
Just Now!
X