पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून त्यात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ३७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह सात लाख ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला. बार्शी तालुक्यातील तावडी गावात हा प्रकार घडला.

सहायक पोलीस निरीक्षक जयवंत गादेकर यांचे वडील वासुदेव  गादेकर हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते कुटुंबीयांसह तावडी गावात राहतात. त्यांची दोन मुले पोलीस खात्यात आहेत, तर एक मुलगा शिक्षक आहे. पोलीस असलेली दोन्ही मुले बाहेरगावी राहतात. रात्री घरात वासुदेव गादेकर हे पत्नी व शिक्षक मुलासह जेवण करून झोपी गेले. तर मुलगा पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला असता मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी गादेकर यांच्या घरात घुसून मारझोड सुरू केली. चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली असता गादेकर गुरुजींनी प्रतिकार केला. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला. नंतर दरोडेखोरांनी घरातील कपाट फोडून तिजोरीतून ३७ तोळे सोन्याचे दागिने तसेच किमती मोबाइल संच व सोनेरी घडय़ाळ असा सुमारे सात लाख ५५ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत गादेकर यांनी आपल्या मेव्हण्याच्या साखरपुडय़ासाठी बँकेतील लॉकरमधून सोन्याचे दागिने घरात आणून ठेवले होते. पांगरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास