06 August 2020

News Flash

VIDEO: सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमध्ये गुंडांचा हैदोस; महिलांना अमानुष मारहाण

या गुंडांनी अमानुषपणे लाकडी दांड्याने महिला आणि मुलींना मारहाण केली.

Solapur pune passenger train : . या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमध्ये काही गुंडांनी क्षुल्लक कारणावरून महिलांना मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या कुर्डुवाडी पारेवाडी स्टेशनजवळ सोमवारी हा प्रकार घडला. महिलांसोबत असलेल्या एका लहान मुलीचा पाय लागल्याने गुंडांच्या टोळक्याने महिलांशी वाद घालायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला की या टोळक्याने महिलांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या टोळक्यात १५ ते २० जणांचा समावेश होता. या गुंडांनी अमानुषपणे लाकडी दांड्याने महिला आणि मुलींना मारहाण केली. या मारहाणीत भीमराव भोसले आणि प्रेमा भोसले गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पीडित महिलांनी केली आहे. त्यामुळेच या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेचा तपास लोहमार्ग पोलिसांऐवजी कुर्डुवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी दौंड पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे हा प्रकार भयानक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मी अनेकदा सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करते. त्यावेळी अनेकदा रेल्वे पोलिसांकडून पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेत कमतरता असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. मात्र, सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमधील प्रकार भयानक आहे. नुकताच सोशल मीडियावर उत्तर प्रदेशात मुलींची छेड काढण्याच्या प्रसंगाचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला होता. सोलापूर-पुणे पॅसेंजर ट्रेनमधील प्रकार या घटनेची आठवण करून देणारा आहे. त्यामुळे आता तरी रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ झाली पाहिजे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2017 6:33 pm

Web Title: goons beaten up women passengers in solapur pune passenger train
Next Stories
1 चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यामुळे तिने आयुष्य संपवले
2 सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या चिमुरडीचा जळून मृत्यू
3 मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’मध्ये घोटाळा; शिवसेनेचा मोर्चा
Just Now!
X