21 January 2021

News Flash

मंदिरात चप्पल घालून गेल्यामुळे दोन गटात तुफान हाणामारी, पडळकरांच्या भावावर गुन्हा दाखल

१२ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल

८ महिन्यापासून बंद असलेली मंदिरं सोमवारी भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. राज्यभरात दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. अशातच सांगलीमध्ये मंदिरात चप्पल घालून गेल्याची घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये मंदिरात चप्पल घालून गेल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी १२ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाचाही समावेश आहे.

सांगली आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. गावातील मंदिरात काही जण चप्पल घालून आले होते, आणि मंदीरात चप्पल का घालून आला, या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली.यावेळी दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १२ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा समावेश आहे.

दरम्यान ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:24 pm

Web Title: gopichand padalakar brother and 12 other case file aginst registered sangali nck 90
Next Stories
1 अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री भडकले; म्हणाले…
2 “मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज ठाकरे राज्यपालांकडे का गेले हे राऊतांना आता समजलं असेल”
3 कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रो रो रेल्वेतून ट्रक बाहेर फेकला गेला; चालकाने मारली उडी आणि त्यानंतर…
Just Now!
X