12 July 2020

News Flash

वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करावे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे युवकांना आवाहन

संग्रहित छायाचित्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे युवकांना आवाहन

नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघीटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य युवकांनी आपल्यामध्ये निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपालांनी जिल्हा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी रुची वळवी या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देतांना कोश्यारी यांनी महिला अत्याचाराच्या घटना केवळ पोलीस दल रोखू शकणार नसल्याचे मांडले. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांंनी यासाठी पुढाकार घ्यावा. कूपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दुर्गम भागात पोषणयुक्त आहार देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर या समस्येवर मात करता येईल, असे त्यांनी धिरसिंग पाडवी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नास उत्तर देतांना सांगितले. सायली इंदिसने भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्यावर वकील झाल्यावर प्रामाणिकपणे काम करावे, स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही हा निश्चय करण्याचा सल्ला राज्यपालांनी दिला. दानिश खाटीकने लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा मांडला. त्यावर राज्य घटनेनुसार समानतेचे तत्व स्वीकारले असल्याने सर्वांना राजकारणात समान संधी मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. निरक्षर असूनही काही व्यक्ती उत्तम कामगिरी करू शकतात. शिक्षणाचा संबंध अंतरज्ञानाशी आहे, त्यावर विद्यार्थ्यांंनी भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

दिपिका पराडके हिच्या ऑनलाईनच्या मुद्यावर वर्षभरात दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली. आदिवासी जनजागृतीसाठी आपण स्वत: ग्रामीण भागात जात असल्याचे त्यांनी कीर्ती तडवीच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. कार्यक्रमाला खासदार हिना गावित, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, बार कौन्सिल सदस्य जयंत जायभावे, संस्थेचे संचालक परवेझ खान, प्राचार्य एन. डी. चौधरी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:29 am

Web Title: governor bhagat singh koshyari interaction with students at law college zws 70
Next Stories
1 कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड
2 व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कासवगती!
3 दामू गायकवाड  यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान
Just Now!
X