News Flash

चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट, वादळी पाऊस; भिंत कोसळून एक ठार

कोरपना तालुक्यात वीज कोसळल्याने ११ बकऱ्यांचा मृत्यू झाला.

चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.

चंद्रपूर शहर वगळता ग्रामीण भागात आज वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पाऊस झाला. चिमूर तालुक्यातील भिसी येथे दुकानाची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

शेख शब्बीर हैदर शेख असे भिसी येथे भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर कोरपना तालुक्यात वीज कोसळल्याने ११ बकऱ्यांचा मृत्यू झाला तर ७० गावातील वीज पुररवठा खंडीत झाला आहे.

बुधवारी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने चिमूर तालुक्यातील भिसी येथे एका दुकानाची भिंत पडल्याने दुकानाजवळ असलेल्या ४ व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. त्यातील शेख शब्बीर हैदर शेख या व्यक्तीला जबर मार लागल्याने चिमूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखली करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. तर उर्वरीत तीन जखमींवर भिसी येथे उपचार सुरू आहेत.

तसेच राजुरा व कोरपना या दोन तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 8:38 pm

Web Title: hail torrential rains in chandrapur district one killed when the wall collapsed aau 85
Next Stories
1 अकोल्यात करोनामुळे आणखी चार जणांचा बळी
2 मराठी मुलांनी संधीचा फायदा उठवावा, कोणतंही काम कमी समजू नये !
3 राज्यातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा; अजित पवार यांचं केंद्र सरकारला पत्र
Just Now!
X