कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मालकीचे अनेक भूखंड समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हडप केले. हे सर्व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचे कार्यकर्ते आहेत, अशी तक्रार शहरातील व्यापार्‍यांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून दिली.असा गौप्यस्फोट खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
नगरसेवक यशश्री बाखरिया यांच्या सत्कारसमारंभात शुक्रवारी खा.चंद्रकांत खैरे बोलत होते.

यशश्री यांनी राजाबाजार आणि मोंढा परिसरातील कचराप्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावला या बद्दल मोंढ्यातील व्यापार्‍यांनी यशश्री यांचा खा.खैरे यांच्याहस्ते सत्कार ठेवला होता. या वेळी बोलतांना खा. खैरे म्हणाले की, जी.एस.टी.मुळे व्यापारी संकटात सापडले आहेत.क्षुल्लक रकमेसाठी व्यापार्‍यांवर धाडी टाकण्याचे सरकारी आदेशाने उद्योग केले जात होते.आपण यात लक्ष घातल्यामुळै व्यापार्‍यांचा छळ थांबला आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जी.एस.टी. या दोन्ही मुळै व्यापारी त्रस्त झाल्याचे आपल्या निर्दशनास आले. या वेळी महापौर नंदू घोडेले, आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती.