‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ कार्यक्रमात शारीरिक, मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन; उद्या वसईत कार्यक्रम

जीवनशैलीमुळे विस्कळीत झालेली मानसिक आणि शारीरिक आरोग्याची घडी आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम वेळीच ओळखून निरोगी आणि तणावरहित जीवन जगण्याचे साधे सरळ उपाय ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमातून जाणून घेता येणार आहेत. वसई येथे रविवार, २४ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आहार, योग आणि आयुर्वेद क्षेत्रातील वक्ते उपस्थितांशी या वेळी संवाद साधणार आहेत.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

मानवी शरीराला जडलेल्या अनेक आजारांचे मूळ हे आधुनिक जीवनशैलीत दडलेले आहे. व्यायाम हा धावपळीच्या आयुष्यात हरवला असून आहाराचे गणितही बिघडले आहे. याचे दुष्परिणाम शरीरावर होत आहेतच, परंतु मनावरील नियंत्रणही हळूहळू ढासळू लागले आहे. यावरील अनेक उपायांची चर्चा सध्या घडत आहे. मात्र यातील नेमके विश्वासार्ह उपाय कोणते, औषधोपचार कसा निवडावा, आहाराचे नियोजन यांविषयी सखोल चर्चा आणि मार्गदर्शन वाचकांपर्यंत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या चर्चासत्रातून घेऊन येत आहे. ‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक माहिती देतील. तर योग आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. आशीष फडके ‘योग आणि आयुर्वेद’ या सत्रामध्ये ताणाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतील.

कुणाचे मार्गदर्शन?

‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ – डॉ. अरुणा टिळक, आयुर्वेदतज्ज्ञ

 ‘योग आणि आयुर्वेद’ – डॉ. आशीष फडके, योग आणि आयुर्वेदतज्ज्ञ

कुठे?- रविवार, २४ नोव्हेंबर

कधी?- विश्वकर्मा हॉल, वीर सावरकर नगर, आनंदनगर, वसई (प.)

वेळ- सायंकाळी ६ वाजता