News Flash

रत्नागिरी, रायगडमध्ये जोरदार पाऊस

पुणे वेधशाळेने दिलेल्या इशा-यानुसार कोकण, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

| August 31, 2014 12:16 pm

पुणे वेधशाळेने दिलेल्या इशा-यानुसार कोकण, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रागयड, रत्नागिरीत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून तेथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथील नद्यांनाही पूर आल्याचे सांगण्यात आले आहे. संगमेश्वर येथील सोनवी नदीची पाण्याची पातळीही सातत्याने वाढत आहे. येथील पावसाचा जोर इतका आहे की, भातशेतीही धोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  दापोली येथे १६८ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून त्यापाठोपाठ गुहागर १३३ मिमी तर रत्नागिरीत १२४ मिमी, लांजा १२६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत राज्याच्या सर्वच भागात चांगल्या पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाडय़ात सर्वदूर २० ते ८० मिलिमीटर इतका मोठा पाऊस पडला. त्यात उदगीर, चाकूर, उमरगा, तुळजापूर, निलंगा, लोहा, रेणापूर, अंबेजोगाई, लातूर, अदमहपूर, बीड, नांदेड, धारूर अशा सर्वच भागांचा समावेश होता.
मुंबईतही वसई, विरार भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही तासांत मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 12:16 pm

Web Title: heavy rain lashes konkan
Next Stories
1 चौंडेश्वरी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे निर्बंध
2 उजनी धरण ८० टक्क्य़ांच्या घरात
3 तीन मंडळांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक
Just Now!
X