शनिवारी रात्रीतून पडलेल्या मोठय़ा पावसामुळे लातूर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीच्या नागझरी व साई या दोन्ही बंधाऱ्यांपासून पाणी साठल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूर शहरात २४ तासांत तब्बल १०२ मि.मी. पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साठण्याचा धोका लक्षात घेऊन महापौर दीपक सूळ, स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे व मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने रात्रभर शहरवासीयांना पाण्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली.
जिल्ह्यतील लातूर १०२, तांदुळजा १३०, बाभळगाव ११०, किल्लारी ८३, मातोळा ८१, बेलकुंड ९०, रेणापूर १८०, कारेपूर १३९, पोहरेगाव ९५, हेर १३०, नागलगाव ८५, चाकूर १११, वडवळ ११०, नळेगाव १६०, झरी १२६, घोणसी ८६, मदनसुरी ९५, पानचिंचाली मंडळात पाऊस झाला आहे.
रविवार, दिनांक ३१ जुल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेल्या पावसाची, आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
लातूर ७३.५० (३७६.०२), औसा ७०.७९ (३६३.०८), रेणापूर १२१.२५ (५१५.५०), अहमदपूर ४४ (४५१.४८), चाकूर ११३.८० (५९१), उदगीर ५९.७१ (४४६.४०), जळकोट ७४(४३३), निलंगा ४७.६३ (४७२.०६), देवणी २५ (३९५.६५), शिरूर अनंतपाळ ६५(५१३.३१), करायला ६९.४२ (४५५.७५) जिल्ह्यातील अपेक्षित पावसाच्या १४२.५१ टक्के पाऊस झाला असून, वार्षकि सरासरीच्या ५६.८२ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यतील मांजरा, रेणा, जाणा, तावरजा, तेरणा या नद्यांसह सर्व ओढेनाले भरभरून वाहत आहेत.