लातूर शहर मतदारसंघातील मतदारांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले. २५२९६२, १४४९६२ या दूरध्वनीवर सर्व माहिती दिली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप काळे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले, त्याच केंद्रांवर विधानसभेचे मतदानही असणार आहे. लोकसभा निवडणुकीत असलेले सर्व मतदार विधानसभेसाठीही राहतील. शिवाय नवीन पुरवणी यादीही असेल. ९१ टक्के मतदारांचे छायाचित्रासह ओळखपत्र तयार आहे. प्रत्येक केंद्रावर मयत मतदार व कायमस्वरूपी मतदारसंघाबाहेर वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची यादी दिली जाणार आहे. कोणत्याही स्थितीत बनावट मतदान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, मतदारसंघातील सर्व फलक काढले आहेत. दि. १९ पूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे काळे यांनी सांगितले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश काळे उपस्थित होते.