येथील बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप युतीला १५, तर एमआयएमला १ जागा मिळाली. व्यापारी मतदारसंघातील उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. यात भाजप व शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. शेतकरी सहकारी विकास गटाला बहुमत मिळाले. माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही.
राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप यांनी शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या नावाखाली गट स्थापन करून निवडणूक लढविली. माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी या गटाचे नेतृत्व केले. या गटाचे १५ संचालक विजयी झाले. शिवसेना व भाजपसह शेतकरी सहकारी विकास पॅनेल निवडणूक मदानात उतरला असताना, माजी आमदार घुगे, बी. डी. बांगर व प्रशांत सोनी यांनाच पॅनेलमध्ये स्थान का मिळाले नाही? हा विषय चच्रेचा बनला होता.
हमाल-मापारी मतदारसंघातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांचा एमआयएमच्या बुऱ्हाण पहेलवान यांनी पराभव केला. शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे राजेश पाटील, रामेश्वर िशदे, दत्तराव जाधव, उत्तमराव वाबळे, रामचंद्र वैद्य, हरिश्चंद्र िशदे, प्रभाकर शेळके, नीताबाई पाटील, जिजाबाई िशदे, रावजी वडकुते, किसन नेव्हल, संजय कावरखे, िलबाजी मुटकुळे, शंकर पाटील, बबन सावंत विजयी झाले.
व्यापारी मतदारसंघातून शिवसेनेचे घुगे, भाजपचे प्रशांत सोनी, हमाल मापारी मतदारसंघातून एमआयएमचे बुऱ्हाण पहेलवान विजयी झाले. माजी आमदार गोरेगावकर यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.