राजीव गांधी निवारा दोन योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट प्रस्ताव तयार करून लोकांकडून पसे उकळण्याचे प्रकार सेनगाव व िहगोली तालुक्यांत उघडकीस आले. या प्रकरणी शहर पोलिसांत संबंधितांवर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती मिळाली.
राजीव गांधी निवारा दोन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरकारकडून बँकेमार्फत मिळणारे ९० हजार, तर लाभार्थीचे १० हजार असे एकूण १ लाख रुपये खर्चातून राजीव गांधी निवारा घरकुलाचे प्रस्ताव तयार करून देणारा सेनगाव व िहगोली तालुक्यांत लाभार्थीकडून एक ते दोन हजार रुपये उकळत होता. या बाबत अनेकांच्या तोंडी तक्रारी आल्या. मात्र, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील एकाने हा उद्योग सुरू केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.
या माहितीवरून संबंधित व्यक्तीने सेनगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी पंकज राठोड यांच्या सहीत व मुद्रांकाचा नमुना झेरॉक्स करून घेतला. झेरॉक्स केलेला नमुना लाभार्थीच्या प्रस्तावावर सतत वापरून बँकेत प्रस्ताव सादर केल्याच्या पोचपावत्या घेऊन लाभार्थ्यांकडून एक ते दोन हजार रुपये उकळण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या व्यक्तीने िहगोली तालुक्यातील नर्सी नामदेव व पहिणी येथील लोकांकडून राजीव गांधी निवारासाठी प्रस्ताव तयार करून दिले व अनेकांकडून पसे उकळले. नर्सी व पहेणी येथील बनावट प्रस्तावांवरून आरोपीचे भांडे फुटले. त्याला सेनगावातील काही व्यक्तींनी शुक्रवारी पकडले असता तो पिशवी सोडून पसार झाला. पिशवीत राजीव गांधी निवारा घरकुल बनावट झेरॉक्सवरील सही व स्टॅम्प मारलेले कागदपत्र सापडले.
ही बाब राठोड यांच्यापर्यंत गेली असता ते तत्काळ सेनगाव येथे पोहोचले व त्यांनी अनोळखी आरोपीच्या थलीत सापडलेल्या कागदपत्रांची पाहणी केली. जुन्या प्रस्तावावरील स्टॅम्प व सहीची झेरॉक्स प्रत काढून ती नवीन प्रस्तावासाठी आरोपी वापरत असल्याचे या वेळी उघड झाले. राठोड यांनी असा प्रकार घडल्याची कबुली दिली व या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कायदेशीर चर्चा होऊन संबंधित आरोपीविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.