News Flash

पद्मदुर्ग किल्ल्यावर फडकवण्यात आला महाकाय भगवा ध्वज

देशातला सर्वात मोठा भगवा ध्वज असल्याचा दावाही सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे

अलिबाग येथील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महाकाय महाकाय भगवा ध्वज फडकावला आहे.  मागील दोन दिवस संस्थेचे कार्यकर्ते यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर तळ ठोकून होते. यापुर्वी त्यांनी जंजिरा किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता.

राज्यातील गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी ही संस्था काम करते. संस्थेच्या माध्यमातून गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहिमही राबवली जाते. संस्थेच्या माध्यमातून कुलाबा, उंदेरी, कोर्लई, आगरकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविली होती. किल्ल्यावरील अस्ताव्यस्त पडलेल्या तोफांना तोफगाड्यांवर ठेऊन त्यांना नवसंजीवनी दिली होती. मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने कायम स्वरुपी राष्ट्रध्वज फडकवला होता.

याच मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा संकल्प संस्थेच्या दुर्गसेवकांनी केला होता. गेली दोन दिवस संस्थेचे दुर्गसेवक पद्मदुर्गावर तळ ठोकून होते. असंख्य अडचणीवर मात करत त्यांनी किल्ल्यावर महाकाय ध्वज स्तंभाची उभारणी केली आणि त्यावर भगवा ध्वज फडकावला. हा देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज असल्याचा दावाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणांना गाफील ठेऊन हि ध्वज उभारणी मोहीम राबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 9:48 pm

Web Title: huge saffron flag on padmadurg by sahyadri pratishthan scj 81
Next Stories
1 भाजपाची सत्ता ‘ऑन द वे’, नारायण राणेंचं सूचक वक्तव्य
2 मार्च महिन्यापर्यंत कोल्हापूर आणि नांदेडमध्ये सुरु होणार DNA लॅब
3 …म्हणून बच्चू कडू घोड्यावरून कॉलेजला जायचे