24 January 2019

News Flash

पिंपरी चिंचडवमधील वाकडमध्ये धक्कादायक घटना, अंधश्रद्धेपायी मारली पत्नीच्या गर्भावर लाथ

पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे गर्भात मुलगी असल्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पतीने पत्नीच्या पोटावर गर्भ पाडण्याच्या उद्देशाने लाथ मारून मारहाण

पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे गर्भात मुलगी असल्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पतीने पत्नीच्या पोटावर गर्भ पाडण्याच्या उद्देशाने लाथ मारून मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती संजय पवार रा.कैलास नगर थेरगाव. या पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा गर्भ हा मुलीचा आहे असा समज सासरच्या मंडळींना झाला होता. या अंधश्रद्धेपायीच एका गर्भवती महिलेला मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी पत्नी स्वाती संजय पवार (२४) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संजय पांडुरंग पवारसह सासू सुमन पांडुरंग पवार, नणंद अर्चना हर्षद यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस याप्रकरणी अधिक करत आहेत.

गर्भात मुलगी असल्याचा संशय असल्याने सासू सुमन पांडुरंग पवार आणि नणंद अर्चना हर्षद यादव या काही दिवसांपासून सुनेला मानसिक त्रास देत धमकी देत होत्या. शनिवारी रात्री तर कहरच झाला. पती संजय पांडुरंग यादव याने पत्नी सोबत भांडण करायला सुरुवात केला आणि गर्भ खाली करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या पोटावर लाथानी मारहाण केली. यानंतर पत्नीने थेट वाकड पोलीस ठाणे गाठले आणि पतीसह सासरच्या मंडळींच्या विरोधात फिर्याद दिली.

वाकड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप सासरच्या मंडळींना ताब्यात घेण्यात आले नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.एस भोगम हे करत आहेत.

First Published on April 16, 2018 4:49 pm

Web Title: husband beats wife over doubt of girl child