आपल्या पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे. आत्महत्या करण्याआधी या व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये पत्नीबरोबर फोटो ठेवत मी तुला भेटायला येत आहे असं म्हटलं होतं. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवल्यानंतर या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

सोनपेठ तालुक्यातील वडगावमध्ये राहणाऱ्या सार्थक बचाटे याचा काही महिन्यांपूर्वीच चंदा या तरुणीशी विवाह झाला होता. २० फेब्रुवारी रोजी सार्थक आणि चंदा दुचाकीवरुन गंगाखेडहून वडगावला जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये सार्थक थोडक्यात बचावला तर चंदाचे निधन झाले. लग्नानंतर काही महिन्यांमध्येच पत्नीचे निधन झाल्याने सार्थकला मोठा मानसिक धक्का बसला. चंदाच्या निधनानंतर सार्थक नैराश्येतच होता. याच नैराश्येतून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

‘चंदाराणी मी तुला भेटायला येतोय,’ असं स्टेटस सार्थकने व्हॉट्सअपवर ठेवलं होतं. इतकचं नाही तर ‘आई, पप्पा, ताई, दाजी मला माफ करा मी चाललयो,’ असं वेगळं स्टेटस सार्थकने आपल्या कुटुंबासाठी पोस्ट केलं होतं. तसेच मित्रांना उद्देशून ‘भावांनो तुम्हाला सोडून चाललोय, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,’ असं स्टेटस सार्थकने ठेवलं होतं. स्टेटस ठेवल्यानंतर मोबाईल घरीच ठेऊन शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आणखी वाचा- पतीवर अंत्यसंस्कार होताच पत्नीची आत्महत्या, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

सार्थकचे स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा भरपूर शोध घेतला. मात्र सार्थकने मोबाईल घरीच ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आलं. अखेर सार्थकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं अन् अनेकांच्या आश्रूंचा बांध फुटला.