जालना जिह्यात एकेकाळी जवळचे मित्र असणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप तसेच आव्हाने-प्रतिआव्हानांच्या फैरी गेल्या काही महिन्यांपासून अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. आमची युती जरी झाली, तरी मी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार’, असा यल्गार शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी नाशिकमध्ये केला आहे.

‘युती झाली तरीही मी जालन्यातून उभा राहणार आहे. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मी विजयी होईल अशी मला १०० टक्के खात्री असल्याचे दानवे म्हणाले. भाजपाची वागणूक अतिशय क्लेशदायक आहे, त्यांना खूप घमेंड आणि मस्ती आहे. त्यांची घमेंड मी उतरवणार, असेही खोतकर म्हणाले आहेत.

मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी लवकरच चर्चाला सुरूवात होण्याची शक्याता आहे. एकीकडे भाजपाच्या काही दिग्गज नेत्यांनी शिवसेना युतीसाठी सकारत्मक असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारच असल्याचं सांगितलं आहे.