21 September 2020

News Flash

खडसे यांचे घूमजाव!

जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात स्वकियांवर आरोपांच्या फैरी झाडून खळबळ उडवून देणारे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चोवीस तासही पूर्ण होत नाहीत तोच आपल्या वक्तव्यापासून

एकनाथ खडसे

जिल्हा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात स्वकियांवर आरोपांच्या फैरी झाडून खळबळ उडवून देणारे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चोवीस तासही पूर्ण होत नाहीत तोच आपल्या वक्तव्यापासून घूमजाव केले आहे. आपले जर दाऊदसोबत संबंध असल्याचे सिद्ध झाले असते तर एका मंत्र्याचे दाऊदसोबत संबंध असल्याने संपूर्ण देश हादरला असता, असे आपणास म्हणायचे होते, अशी कोलांटउडी खडसे यांनी मारली आहे.

गुरूवारी भुसावळ तहसीलदार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खडसे यांनी आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढल्याचे सांगितले. खडसे यांच्या आरोपांचा रोख नेमका कोणावर, याविषयी भाजपसह इतर राजकीय पक्षांमध्येही चर्चा रंगली असतानाच खडसे हे वक्तव्यापासून एक पाऊल मागे सरकले आहेत.

 

गौप्यस्फोट करावाच ; काँग्रेस-राष्ट्रवादीचे आव्हान

मुंबई: आपण तोंड उघडले तर देश हादरून जाईल, हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे विधान गंभीर असून, देशहितासाठी खडसे यांनी ही माहिती जाहीर करावी, असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. देश हादरवून सोडणारी माहिती दडवून ठेवणे देशहिताचे नाही, असा सल्लाही या दोन्ही पक्षांनी खडसे यांना दिला आहे. खडसे यांच्याकडे देश हादरवून सोडणारी माहिती असल्यास त्यांनी ती लगेचच जाहीर करावी. ही माहिती दडवून ठेवणे देशहिताचे नाही. यामुळेच खडसे यांनी तो गौप्यस्फोट करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. खडसे यांच्याकडे असलेल्या माहितीमुळे देश हादरणार असल्यास त्यांनी ही माहिती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:05 am

Web Title: if i open my mouth the country will shake eknath khadse
Next Stories
1 जेऊरच्या कौतुक वर्षांवात ‘सैराट’चे कलाकार चिंब
2 विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल तीव्र प्रतिक्रिया
3 शासनाच्या संकेतस्थळावर अद्याप एकनाथ खडसे मंत्रीच
Just Now!
X