07 March 2021

News Flash

नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी : रामदास आठवले

ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी याबाबत तक्रार करणे गरजेचे होते. केवळ एखाद्याला अडकवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये, असे मतही यावेळी आठवले यांनी व्यक्त केले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

सध्या देशभरात उठलेल्या मीटूच्या मोहिमेबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणावर बोलताना जर नाना पाटेकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी भुमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

पुण्यात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांसह पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देशात सध्या उठलेल्या मिटूच्या वादळाबाबतही भाष्य केले.

केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही काही पत्रकार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असताना आठवले म्हणाले, मिटूबाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत त्यानुसार दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी याबाबत तक्रार करणे गरजेचे होते. केवळ एखाद्याला अडकवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये.

दरम्यान, आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत आठवले म्हणाले की, माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास माझा संबंध मिटूशी नव्हे तर युट्यूबशी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 5:28 pm

Web Title: if nana patekar is guilty then action should be taken against him says ramdas athavale
Next Stories
1 मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा
2 चार दिवसांपासून पाणी नाही, संतप्त महिलांचा पालकमंत्री गिरीश बापट यांना घेराव
3 पुण्यात नागरिकांच्या मारहाणीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
Just Now!
X