राज्यातील टोल आकारणीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न्यायालयात याचिका दाखल केली असली, तरी अद्याप त्यावर एकही सुनावणी न झाल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आश्चर्य व्यक्त केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना टोलचा विषय निघाला असता राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
तुमची बुद्धिमत्ता महाराष्ट्राच्या कल्याणासाठी उपयोगी पडो – राज ठाकरे
न्यायालयाने न्याय दिला पाहिजे, मात्र, अजून आमच्या याचिकेवर सुनावणीच झाली नाही. आता कसं करायचं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले. या नगरसेवकांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जळगावच्या जनतेचे राज ठाकरे यांनी आभार मानले. राज्यातील मदरशांना अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे केवळ राजकारण असल्याची टीकाही त्यांनी केली.
सत्ता परिवर्तन करावेच लागेल – राज ठाकरे