म्हैसाळ गर्भपात प्रकरण; लिंगचाचणी अहवाल पुढील आठवडय़ात मिळणार

म्हैसाळ बेकायदा गर्भपातप्रकरणी १४ दाम्पत्यांच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान  प्लॅस्टिक पिशवीमध्ये मिळालेल्या १९ पकी ८ भ्रूणांचे वय १६ ते २० आठवडय़ांचे होते, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला असून, या भ्रूणांचा िलगचाचणी अहवाल पुढील आठवडय़ात तपास पथकाला मिळेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

म्हैसाळ बेकायदा गर्भपातप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गर्भपातासाठी आलेल्या दाम्पत्यांची माहिती संकलित केली असून, यापकी ७ जणांच्या रक्ताचे नमुने गेल्या आठवडय़ात, तर आणखी ७ पती-पत्नीच्या रक्ताचे नमुने सोमवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घेण्यात आले. हे रक्तनमुने डीएनए चाचणीसाठी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगाशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

सोमवारी डीएनए चाचणी घेण्यासाठी रक्तनमुने घेण्यात आलेली दाम्पत्ये मालगाव, ता. मिरज, मोरगाव ता. कवठेमहांकाळ, शहापूर ता. हातकणंगले, करवीर आणि शिरोळ तालुक्यातील तेरवाड, गौरवाड, शिरढोण या गावातील आहेत.

दरम्यान, म्हैसाळ ओढय़ाकाठाला पुरण्यात आलेल्या १९ भ्रूणांच्या अवशेषांपकी ८ भ्रूणांच्या वयाबाबतची तपासणी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. या भ्रूणांचे वय १६ ते २० आठवडे असल्याचे तपासणीमध्ये आढळून आले आहे. िलगचाचणीसाठी या भ्रूणांचे अवशेष पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून, पुढील आठवडय़ात अहवाल तपास पथकाच्या हाती मिळेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या ८ पकी ६ भ्रूणांचे िलग निश्चित करण्यात प्रयोगशाळेत यश आले असून, यामध्ये ३ स्त्रीिलगी आणि ३ पुिल्लगी भ्रूण असल्याच प्राथमिक निष्कर्ष निघाला आहे. मात्र अद्याप काही चाचण्या झाल्यानंतरच हा निष्कर्ष अंतिम करण्यात येणार असल्याने याबाबत तपासाधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.