इंदापूर तालुक्यात रुई गावात विमान कोसळले असून या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालयजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बारामतीतील कार्वर अॅव्हिएशनचे एक विमान कोसळले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ३५०० फुट उंचीवरून हे विमान खाली कोसळले. यात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला असून स्थानिकांच्या मदतीने त्याला खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन बारामती येथे हलवण्यात आले आहे. सिध्दार्थ टायटस असे जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव आहे.