भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६८ वा वर्धापन दिन येथील पोलीस परेड मदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण, खनिकर्म व कामगारमंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती चित्रा पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती भाई पाशिलकर, समाजकल्याण सभापती गीता जाधव, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष मोळवणे उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांना हार्दकि शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. राज्यस्तरावरदेखील नसíगक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अल्प मुदतीच्या कर्जाचे रूपांतर मध्यम मुदत कर्जामध्ये केले आहे. जे शेतकरी कर्जाचा वार्षकि हप्ता बँकेत विहित मुदतीत भरतील त्यांच्या कर्जावरील व्याज २०१५-१६ मध्ये माफ करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांसाठी ६ टक्के दराने व्याज भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी या योजनेतील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दारिद्रय़रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. महसूल प्रशासनाने या वर्षी ५१ शिबिरांचे आयोजन करून १३ हजार ५९३ दाखल्यांचे वाटप केले. दळी जमिनींबाबत जिल्हास्तरीय समितीने ६६३ दावे मंजूर करून त्यांना टायटल प्रमाणपत्र दिले आहे. ज्यायोगे २४१.८१ हेक्टर आर वनक्षेत्रावर आदिवासींना हक्क देण्यात आला आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून प्रशासन हा उपक्रम राबवीत आहे. सर्वसामान्यांना तत्पर सेवा देण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.