19 October 2019

News Flash

हवाई दलात २८ वैमानिकांची तुकडी दाखल

आर्मी एव्हिएशनच्या स्कुलतर्फे शनिवारी आयोजित दीक्षांत सोहळ्यात ९० तासांचा हवाई सराव पूर्ण करत २८ अधिकाऱ्यांची तुकडी लष्करी हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाली. तसेच ‘एव्हीएशन

नाशिक येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन स्कुलच्या दीक्षांत सोहळ्यात सवरेत्कृष्ट कामगिरीची नोंद करणाऱ्या वैमानिकांसमवेत तोफखाना स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया.

आर्मी एव्हिएशनच्या स्कुलतर्फे शनिवारी आयोजित दीक्षांत सोहळ्यात ९० तासांचा हवाई सराव पूर्ण करत २८ अधिकाऱ्यांची तुकडी लष्करी हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाली. तसेच ‘एव्हीएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर’ या प्रशिक्षणाशी संबंधित शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

शनिवारी सकाळी गांधीनगर येथील स्कुलच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात प्रत्यक्ष युद्धात या दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टर्सने सहभाग नोंदविला. सुमारे अर्धा तास चाललेल्या प्रात्यक्षिकांनी स्कुलच्या मैदानास जणू रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या निमित्ताने लष्कराच्या हवाई दलात २८ वैमानिकांची तुकडी नव्याने समाविष्ट झाली आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तोफखाना स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘कॉम्बॅक्ट एव्हीएटर्स’ प्रशिक्षणात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून कॅप्टन अनिकेत मलीक तसेच ‘एव्हीएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर’ शिक्षणक्रमात मेजर प्रभुजित सिंग यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

वैमानिकांची कमतरता भरून काढण्यासाठी आर्मी एव्हीएशन स्कुलची स्थापना करण्यात आली आहे. हवाई सरावाचा अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना येथे सुरूवातीला ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कॉम्बॅक्ट एव्हीएटर्स’ हे शिक्षणक्रम करावे लागतात. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव प्रशिक्षणार्थीना दिला जातो. आधुनिक हेलिकॉप्टर दलात सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, प्रशिक्षणाची धुरा आजही प्रदीर्घ काळापासून कार्यरत चेतक, चिता सोबत ध्रुववर आहे. त्यास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या वैमानिकांनी दुजोरा दिला. हवाई दलाची भूमिका हेलिकॉप्टरने हल्ला चढविण्यापर्यंत विस्तारली आहे. सुरक्षित उड्डाण हा महत्वाचा घटक असल्याचे सलारिया यांनी सांगितले.

First Published on May 12, 2019 1:26 am

Web Title: indian air force