शहरातील औद्योगिक वसाहतीत शनिवारी सकाळी चटईनिर्मिती कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. औद्योगिक वसाहतीत असलेल्या लौकिक कॉर्पोरेशन या चटई कारखान्यात ही घटना घडली. आठ वाजता वरच्या मजल्यावरील गोदामात अचानक आग लागली. काही वेळातच ती वेगाने सर्वत्र पसरली. या वेळी वरील मजल्यावर अडकलेल्या कामगारांना इतरांनी बाहेर काढले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने पोहोचल्याने आग अधिक भडकली. त्यात गोदामातील यंत्रणेसह साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.