जवखेडे येथील दलित कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाथर्डीमधील न्यायालयाने संशयित आरोपी प्रशांत जाधव याला गुरुवारी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत जाधव याला त्याच्या घरातून बुधवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी प्रशांत जाधव याच्या घरातून काही शस्त्रे व कपडे जप्त केले. सुरुवातीला याबाबतीत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. ही शस्त्रे व कपडे तपासणीसाठी तातडीने नाशिकला न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. पोलीसांनी या घरातून दोन कुऱ्हाडी, एक करवत, एक जांबीया व ५ ते ६ जणांचे रक्ताळलेले कपडे जप्त केले. प्रशांत हा मयत संजय जाधव यांचा पुतण्या आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे (खालसा) गावी २० ऑक्टोबर रोजी संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांचा १९ वर्षांचा मुलगा सुनील जाधव यांची खांडोळी करून क्रूर हत्या करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यांपासून पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप