अलिबाग शहरातील सोन्याच्या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी अलिबाग येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शने केली. सोन्याच्या दागिन्यांवर अबकारी कर लावण्याविरोधात संपूर्ण देशभरात सोन्याच्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. रायगड जिल्ह्य़ातदेखील सराफ बाजार बंद आहे; परंतु वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दुकान सुरू आहे. शुक्रवारी अलिबागमधील सोन्याच्या व्यापाऱ्यांनी अलिबाग येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शने करून त्यांचा निषेध केला. या निदर्शनानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. अबकारी कर रद्द व्हावा यासाठी सरकारवर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन (जेजेएफ), इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए), ऑल इंडिया सराफ असोसिएशनसह सर्व फेडरेशनने आपल्या संघटनांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे रायगड जिल्हा सराफ संघटना संपात सहभागी झाली आहे.

horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर