News Flash

कविता महाजन यांचे प्रकाशित साहित्य व त्यांना मिळालेले पुरस्कार

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

कविता महाजन यांचे प्रकाशित साहित्य व त्यांना मिळालेले पुरस्कार

प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे सोमवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन यांचा जन्म पाच सप्टेंबर १९६७ रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात झाला.

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या.

प्रकाशित साहित्य

अंबई : तुटलेले पंख

आग अजून बाकी आहे

आगीशी खेळताना

आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा

कुमारी माता

कुहू (लहान मुलांसाठी) – लेखसंग्रह

ग्राफिटीवॉल – लेखसंग्रह

बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह

जोयानाचे रंग – बालसाहित्य

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम – कादंबरी

तत्पुरुष – काव्यसंग्रह

तुटलेले पंख धुळीचा आवाज – काव्यसंग्रह

पूल नसलेली नदी ( कथा संग्रह)

म्रृगजळीचा मासा (काव्यसंग्रह)

ब्र – कादंबरी

भिन्न – कादंबरी

रजई (इस्मत चुगताई) – लघुकथासंग्रह

वैदेही यांच्या निवडक कथा – कथा संग्रह

समतोल खा सडपातळ रहा – पाकशास्त्र

समुद्रच आहे एक विशाल जाळं – कवितासंग्रह

पुरस्कार- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)- कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)- साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)- मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 9:39 pm

Web Title: kavita mahajan literature
Next Stories
1 पुणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
2 कामं वाट पाहताहेत… कविता महाजन यांची अखेरची भावनिक पोस्ट
3 भाजपच्या गलथान कारभाराचा पुणेकरांना फटका : अजित पवार
Just Now!
X