ही आम आदमी पक्षाला परदेशातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याचा तपशील त्यांनी अद्याप खुला केलेला नाही,मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार आठवण करून असा आरोप केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. गेल्या वर्षअखेरीस झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला धूळ चारणाऱ्या आम आदमी पक्षाला निवडणुकीसाठी अर्थपुरवठा कुठून झाला, याबाबत चौकशी करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला. याबाबत पत्रकारांशी बोलताना, केंद्र सरकार या आर्थिक स्रोतांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून केजरीवालांना आजवर तीन स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत, मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणताही स्रोत खुला करण्यात आलेला नाही, असा आरोप शिंदे यांनी केला.