भाविकांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीला अर्पण केलेले अलंकारांचं आज मूल्यांकन करण्यात आलं. २०१८ आणि २०१९ या वर्षात दान करण्यात आलेल्या दागिन्यांचं मूल्यांकन करण्यात आलं. नवसफेड केलेल्या दागिन्यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी मूल्यांकनकार आणि शासनमान्य सराफ विष्णु सखाराम ज्वेलर्सचे मालक पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे (मिरज), उमेश पाठक यांनी १७ जून ते २० जून या कालावधीत पूर्ण केले. मूल्यांकन करताना सदस्य महेश जाधव, संगिता खाडे, शिवाजीराव जाधव, विजय पोवार यांनी भेट देऊन पाहणीही केली.

मूल्यांकन करताना समितीचे सह सचिव शिवाजी साळवी, निवास चव्हाण, राहुल जगताप, प्रशांत गवळी हेदेखील हजर होते. एकंदरीत २२ कोटी ६१ लाख, ५७ हजार ६५३ रुपये जमा झाले. हे उत्पन्न करवीर निवासिनी देवस्थान, केदारलिंग देवस्थान, एकत्रित देवस्था फंड या तिन्हीचे मिळून हे उत्पन्न आहे. तर १४ कोटी ११ लाख २१ हजार ४५८ रुपये ९१ पैसे खर्च झाल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

करवीर निवासिनी देवस्थान आणि केदारलिंग देव यांना सोने आणि चांदीचे मिळून एकूण १ कोटी १९ लाख ९९ हजार २८१ रुपये किंमतीचे दागिने भक्तांनी दिल्याचेही मूल्यांकन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.