07 March 2021

News Flash

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला ‘ब्रेक’, कंपनीसह प्रवाशांनाही फटका

प्रवाशांना तिकिटाचे पैसे मिळणार परत

(सांकेतिक छायाचित्र)

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर यादरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती रविवारी ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली. या दरम्यान तिकीट बुक केलेल्यांना तिकिटाचा परतावा दिला जाईल असंही कंपनीने स्पष्ट केलंय.

ट्रू-जेट कंपनीचे ७२ प्रवासी क्षमतेचे विमान त्याच्या वेळेमुळे तसेच इतर ठिकाणांहून हे विमान येत असल्याने नियोजित वेळेपेक्षा ते उशीरा येण्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यातच मुंबईत विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्यानेही विमान उतरवण्यास उशीर होतो. परिणामी विमानसेवा थांबवण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रू-जेट कंपनीने २ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू केली. आठवड्यातून पाच दिवस सुरू राहणार्‍या या विमानसेवेला दुपारची वेळ असूनही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमानसेवा सातही दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी असताना या सेवेलाच आता काहीसा ब्रेक लागला आहे. मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टी रिकारपेटिंगच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले. याचा फटका कंपनीसह प्रवाशांनाही बसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 9:33 am

Web Title: kolhapur mumbai air service temporary closed sas 89
Next Stories
1 संजय राऊत यांचे ट्विट हल्ले सुरूच; म्हणाले, शेठ…
2 टिपेश्वर अभयारण्यातील ‘टी१-सी१’ वाघाची सफर; पाच महिन्यात १३०० किमी प्रवास
3 कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’सारखा दिसतो -शिवसेना
Just Now!
X