कोल्हापूर महापालिकेमध्ये महाविकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपाला केवळ एक मत मिळालं. त्यामुळे निलोफर या ४८ विरुद्ध एक अशा ४७ मतांच्या फरकांनी जिंकून आल्या आहेत. भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने भाजपाच्या उमेदवाराला केवळ एकच मत मिळाले.

महाविकास आघाडीतील पक्षांच्या एकीमुळे निलोफर या केवळ महापौरच झाल्या नाही तर त्यांना कोल्हापूरच्या ५० व्या महापौर होण्याचा मान मिळाला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचे संख्याबळ पाहता निलोफर यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपा-ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांना निवडणुकीमध्ये केवळ एक मत मिळालं. भाजपा-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थितीत राहिले. भाजपाचे सदस्य असणारे कमलाकर भोपळेच मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित होते. त्यांनीच पागर यांना मिळालेलं एकमेव मत दिलं. सभागृहामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं.

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
dharashiv lok sabha marathi news, dharashiv 31 candidates lok sabha
धाराशिव: चार उमेदवारांची माघार, मतदारसंघात पहिल्यांदा सर्वाधिक ३१ उमेदवार आखाड्यात
Sureshdada Patil
शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुरेशदादा पाटील यांचे मातोश्रीवर प्रयत्न; भाजपचा घटक पक्ष दुरावणार?
Sevak Waghaye
“नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”


कोल्हापूरच्या नवनिर्वाचित महापौर निलोफर आजरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी अवघ्या सव्वा दोन महिन्यामध्ये आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिल्याने महापौरपदाची निवडणुक घेण्यात आली. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौर म्हणून निवड झालेल्या लाटकर यांनी महापालिकेच्या विशेष सभेमध्ये राजीनामा दिला होता. राज्यामधील सत्तास्थापनेचा तिढा सुरु असतानाच कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीचा पहिला यशस्वी पॅटर्न राबवत लाटकर यांना निवडून आणलं होतं.