News Flash

राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे सीआयडीकडून प्रसिद्ध, माहिती देण्याचे आवाहन

छायाचित्रांमधील आरोपींची कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारात मृत्यू पावलेल्या राहुल फटांगडे याच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे सीआयडीने प्रसिद्ध केली आहेत. तसेच यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारात मृ्त्यू पावलेल्या राहुल फटांगडे याच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेशन विभागाने (सीआयडी) प्रसिद्ध केली आहेत. तसेच छायाचित्रांमधील आरोपींची कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात स्थानिक सणसवाडीचा रहिवासी असलेल्या राहुल फटांगळे या तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत तसेच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीआयडीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून ४ आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर आणखी तीन नव्या आरोपींची छायाचित्रे आणि व्हिडिओ सीआयडीने जाहीर केले आहेत.

या छायाचित्रांमधील तीन अज्ञात तरुणांनी राहुलला काठ्यांनी आणि दगडांनी ठेचून ठार मारले होते. या तिन्ही आरोपींबद्दल माहिती देण्याचे आव्हान सीआयडीने केले आहे. माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2018 1:25 pm

Web Title: koregaon bhima violence the pictures of the killers of rahul phatangade released by cid and appeal to inform
Next Stories
1 सुळसुळाट फक्त घोषणांचा
2 पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे
3 पाऊस आला, वीज गेली..!
Just Now!
X