News Flash

रोहे : कुंडलिका नदीनं धारण केलं रौद्ररुप

रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

रायगड जिल्ह्यातील रोहे या ठिकाणी असलेल्या कुंडलिका नदी तुडुंब भरुन वाहू लागली आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारपासूनच रोह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळए कुंडलिका नदीने रौद्ररुप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. रोहा नागोठणे मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलीस तैनात करण्यात आले आहे. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षेचा कारणास्तव या मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. रोह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. रोहा ते मुंबई, पुणे, अलिबागकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:23 pm

Web Title: kundlika river overflow in roha heavy rain in raigad scj 81
Next Stories
1 महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांची सुखरूप सुटका
2 महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या बचावासाठी नौदल, हवाईदल सरसावले
3 Mumbai Rain : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका
Just Now!
X