सावंतवाडी  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनाला मोठा वाव असूनही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी किनारी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत आहेत. देवबाग, मालवण, तारकर्ली, शिरोडा वेळागर, रेडी, उभादांडा, मोचेमाड अशा अनेक किनाऱ्यावर पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत आहेत.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?

देशी आणि विदेशी पर्यटकांची गर्दी विशेषत: सागरी किनाऱ्यावर होत असून याकडे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. या सागरी किनाऱ्यावरील पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या सागरी किनाऱ्यावर जाण्यासाठी अरुंद रस्ते असून या रस्त्यावरून वाहनांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बहुतेक किनाऱ्यावर जाण्यासाठी एकेरी वाहतुकीचे रस्ते आहेत. ते रस्ते अरुंद असल्याने  पर्यटकांच्या वाहनांची  गर्दी झाल्यानंतर रस्त्यातून वाहतूक करणे अवघड बनत चालले आहे.

तसेच किनाऱ्यावर पर्यटकांना बसण्यासाठी किंवा पाहण्यासाठी मनोरे देखील उभारलेले नाहीत. तसेच समुद्रामध्ये  आंघोळ करत मौजमजा करणाऱ्या पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी देखील सुविधा सागरी किनाऱ्यावर नाही. काही भागांमध्ये  पर्यटकांसाठी शौचालयाची गरज असूनही ती गरज उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

शिरोडा वेळागर येथे ताज ग्रुपचा पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प उभारण्याचा शासनाने करार केलेला आहे. मात्र या भागांमध्ये अरुंद रस्ते आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांची मोठी धांदल उडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सागरी किनारे स्वच्छ आणि सुंदर असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटक आहेत येत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा गोव्यापेक्षा पर्यटनासाठी विलोभनीय अचंबित करून टाकणाऱ्या पर्यटनासाठी खुणावत असताना महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे याठिकाणी पर्यटकांना मोठे मनस्ताप सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. सागरी किनाऱ्यावर सुट्टीच्या काळात पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांना अपघात देखील होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासन व राज्य पर्यटन महामंडळाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.