26 February 2021

News Flash

Birthday Special: ‘चिंधी’ ते ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा अंगावर काटा आणणारा प्रवास

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

सिंधुताई सपकाळ

ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सिंधुताईंची दुसरी ओळख म्हणजे ‘अनाथांची माय’. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगली भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. लहानपणापासूनच बुद्धिमान असल्या तरी परिस्थितीमुळे जेमतेम मराठी चौथीपर्यंत त्यांना शिकता आले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.

संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्यासाठी त्या परदेश दौरे करतात. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे.

>> सिंधुताईंनी स्थापन केलेल्या संस्था

बाल निकेतन हडपसर ,पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन)

>> सिंधुताईंना मिळालेले पुरस्कार

  • सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • महाराष्ट्र शासनाचा २०१० चा अहिल्याबाई होळकर पुरस्कार
  • रिअल हीरो पुरस्कार (२०१२)
  • २००८ साली ‘लोकसत्ता’ने सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार देऊन गौरवले
  • भारत सरकारमार्फत देण्यात येणारा २०१८ चा ‘नारी शक्ती पुरस्कार’

अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या अनाथांच्या माईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 9:50 am

Web Title: life journey of sindhutai sapkal scsg 91
Next Stories
1 ‘शिवसेनेच्या हट्टामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट’
2 “कदाचित युतीचा पोपट मेलाय, जाहीर कोणी करायचं हाच प्रश्न शिल्लक”
3 महाराष्ट्र ही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही; शिवसेनेचा भाजपावर निशाणा
Just Now!
X