News Flash

चिमुकल्यांसाठी स्पर्धा : घरातूनच होऊ शकता सहभागी

लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफचा उपक्रम

"आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!" चित्र काढा, व्हिडिओ तयार करा, क्राफ्टिंग करा, स्लोगन लिहा... असं काहीही भन्नाट करू शकता. पण, त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जायला हवा…

बालमित्रांनो, “हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे…” निसर्गाचे सुंदर वर्णन असलेली बालकवींची ही कविता तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. पण मोठ्यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या सुंदर निसर्गाचा ऱ्हास हाऊ लागला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंगसारखी अनेक संकटे आपल्यावर ओढवली. मोठी माणसं चुकीची वागली की आपण बच्चेकंपनीलाच त्यांची चूक लक्षात आणून द्यावी लागते.

म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही एक भन्नाट स्पर्धा घेऊन आलो आहोत. लोकसत्ता डॉट कॉम आणि ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेने एकत्र येऊन ६ ते १४ वर्ष वयोगटातील तुम्हा बाल शिलेदारांसाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. डोण्ट वरी! तुम्ही घरात बसून या स्पर्धेत भाग घेऊ शकता. आहे की नाही गंम्मत! या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू शकणार आहात.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेचं नाव आहे, “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” यासाठी चिमुकल्यांनो तुम्ही हव्या त्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. चित्र काढा, व्हिडिओ तयार करा, क्राफ्टिंग करा, स्लोगन लिहा… असं काहीही भन्नाट करू शकता. पण, त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जायला हवा… म्हणूनच तर तुम्हाला “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” म्हटलं आहे.

वयोगट कोणता?
६ ते १४ या वयोगटातील कोणताही मुलगा/मुलगी यात सहभागी होऊ शकतात.

कुठे पाठवायचं ?
तुमचं चित्र, वरील संदेश देणारा व्हिडिओ, क्राफ्टिंगचा व्हिडिओ, स्लोगन यापैकी जे काही तुम्ही तयार कराल ते onlineloksatta@gmail.com या इमेल अ‍ॅड्रेसवर पाठवा. आपली कलाकृती पाठवताना इमेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पालकांचा मोबाईल नंबर आणि इमेल अ‍ॅड्रेस अवश्य लिहा.

मुदत कधीपर्यंत?
तुमची कलाकृती आम्हाला २० नोव्हेंबर २०२० पर्यंत कधीही पाठवू शकता.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना काय मिळणार बक्षीस?
येणाऱ्या सर्व कलाकृतींतून लोकसत्ता आणि युनिसेफचे जुरी मेंबर पाच विजेते निवडतील. त्यांना उत्कृष्टतेसाठी खास डिजिटल प्रमाणपत्र दिलं जाईल. शिवाय पहिल्या शंभर उत्कृष्ट कलाकृतींसाठीही सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. याशिवाय या उत्कृष्ट आणि निवड झालेल्या कलाकृतींना लोकसत्ता डॉट कॉमच्या सोशल मीडियावर आणि युनिसेफद्वारे प्रसिद्धी दिली जाईल.

तर मग… बालमित्रांनो लागा कामाला… चालवा डोकं… तुमच्या छोट्याशा डोक्यामधून येऊ द्या भन्नाट आयडियांचा खजिना बाहेर… द्या जगाला संदेश…
आम्ही वाट पाहतोय, तुमच्या ईमेलची…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 6:22 pm

Web Title: loksatta dot com and unicef organised competition for kids save environment dd70
Next Stories
1 काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये – अनिल परब
2 राज्यपालांनी अर्णबपेक्षा नाईक कुटुंबाची काळजी करावी – नवाब मलिक
3 ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींची मदत
Just Now!
X