News Flash

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित, आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय

फोटो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते. कुणालाही आकर्षित करेल असेच ते दृश्य होतं. जैवविविधता आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्व आहे असंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या सरोवराची दोन छायाचित्र ट्विट करुन ही माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे लोणार सरोवराचे हे फोटो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेले आहेत.

लोणार अभयारण्य हे जून २००० मध्ये निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. ३६५.१६ हेक्टर परिसरात हे क्षेत्र असून ७७.६९ हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे हे सरोवार आहे. लोणार सरोवराला जागतिक स्तरावर महत्व आहे. लोणार हे रामसर पाणथळ क्षेत्र घोषित झाल्याने लोणार सरोवराच्या प्रसिद्धीत जागतिक पातळीवर भर पडणार आहे.

रामसर पाणथळ क्षेत्र म्हणजे काय?
इराणच्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ ला पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अमलबजावणी सुरु झाली. भारताने १९८२ पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. रामसर संकेत स्थळावर घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळांच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात असलेले केथमलेक सरोवार आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराला आता रामसर पाणथळ स्थळ घोषित केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 10:08 pm

Web Title: lonar lake is now declared as ramsar wetland area aditya thackeray big decision scj 81
Next Stories
1 ‘शिवकाळाचा अमूल्य खजिना अनुभवला’, बाबासाहेब पुरंदरेंना भेटल्यानंतर अमोल कोल्हे भावुक
2 महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
3 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक
Just Now!
X