लोणावळा आणि खंडाळा येथे नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. नवीन वर्ष म्हटलं की पार्टी, मद्यपान, दंगा मस्ती, हुल्लडबाजी या सर्व गोष्टी आल्या. परंतु, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी केली तर लोणावळा शहर पोलीस तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाजीवर याचा थेट परिणाम होणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून नवीन वर्षाचा पर्यटकांनी आनंद लुटावा असे आवाहन लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी केले आहे.

लोणावळा आणि खंडाळा या परिसरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. त्यात बहुतांश पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्यांची संख्या जास्त असते. परराज्यातून देखील अनेकजण नवीन वर्ष आनंदीमय साजरे व्हावे यासाठी लोणावळा आणि खंडाळा पर्यटनस्थळाची निवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत बदललेली दिसत आहे. अगदी आता मद्यपान आणि धुंद होऊन नाचण्यात नवीन वर्षाच स्वागत केल्याचं धन्यता तरुण तरुणी मानतात. यामुळे पर्यटनस्थळी कुटुंबासोबत असलेल्या व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत असतो. याला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी कडक कायदेशी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावर्षी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

लोणावळा शहर पोलिसांनी ऐकूण सहा पथके तयार केली आहेत, त्यांची नजर पर्यटकांवर असणार आहे. तुंगार्ली, खंडाळा, गावठाण, वलवन, रायवूड, टायगर पॉईंट, भुशी धरण, या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही पथके तैनात असणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर विशेष नजर असणार आहे. मोठ्या प्रमाणावर मद्यपान विक्री होणाऱ्या दुकानावरही पोलीस लक्ष ठेवणार असून संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तीची ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करण्यात येणार आहे. ज्यामुळे त्या व्यक्तीने मद्यपान केले की नाही हे स्पष्ट होणार आहे. तसेच नवीन वर्षांच्या अनुषंगाने चेक पॉईंट उभारण्यात आले आहेत, नाकाबंदीही केलेली आहे.