कोपरगाव : लहान मुलांमध्ये करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बाधितांवर शास्त्रोक्त उपचार करत चिमुकल्यांचे स्मित हास्य जपत करोनाला हरवूया. असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील बालकांमध्ये होणारा करोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे(आव्हाड), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नासिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली लहान मुलांमध्ये होणारा करोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात संदर्भात तालुका पातळीवर नियोजन करण्यासंदर्भात कळवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यत प्रथमच कोपरगाव तालुक्यात या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

तहसीलदार योगेश चंद्रे यांचे दालनात डॉ. उज्ज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी चलचित्र फितीचा वापर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, बालरोग कार्य दलाचे अध्यक्ष डॉ.अजेय गर्जे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. आतिष काळे, डॉ. शंतनू सरवार, डॉ. प्रियंका मुळे, शहरी आरोग्य अभियानच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर(आहेर), डॉ. पूजा बोर्डे, डॉ. विकास घोलप, डॉ. साहिल खोत, डॉ. नितीन बडदे, डॉ. सुजित सोनवणे, डॉ. आसेफा पठाण, डॉ. वरद गर्जे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. कृष्णाजी पवार, डॉ. अरुणा गाताडे, डॉ. सुवर्णा काळे, डॉ. वर्षां लिंपणे, डॉ. संजीवनी तोडकर, डॉ. संकेत पोटे, डॉ.आदित्य पाटील, डॉ.आयुब शेख, डॉ. सुधीर वाणी, डॉ. नेहा वाघमारे, डॉ. बाळासाहेब आडसरे, डॉ. संतोष तिरमखे यांचे सह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.