महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली. @OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2020
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.